स्वराज्य वार्ता मुखेड ता प्रतिनिधी मारोती पा वडजे
पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी पालखी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन
21 नोव्हेंबर रोजी कुस्त्यांची भव्य दंगल
मुखेड तालुक्यातील उंद्री (प. दे.) येथे श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून काल रात्री जागरण तर दिनांक 20 नोव्हेंबर 2025 गुरुवारी सायंकाळी भव्य पालखी सोहळा आणि शुक्रवारी सकाळी महाप्रसाद तर दुपारी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.
या खंडोबाचा जागरण भव्य पालखी सोहळा आणि कुस्तीची दंगल आणि महाप्रसाद धार्मिक कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भक्तमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उंदरी पदे यात्रा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.काल रात्री श्री खंडोबा मंदिर येथे जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला असून आज कार्तिक अमावस्या दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य पालखी सोहळा आयोजित केला आहे. पालखी सोहळ्याचे मानकरी श्री यशवंत संभाजीराव बोडके यांच्या निवासस्थानी श्री मल्हारी माळसाकांतची पालखीमध्ये स्थापना, विधिवत पूजन आणि आरती करून पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
फटाक्यांची आतिषबाजी करीत हा पालखी सोहळा वाद्य वाजंत्री सह गावातील मुख्य मार्गावरून ग्रामदेवतांचं पूजन – दर्शन करत श्री खंडोबा मंदिराकडे जाणार आहे. श्री खंडोबा मंदिर येथे श्री मल्हारी माळसाकांत खंडोबाची विधीवत पूजा आणि आरती मानकरी आणि प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दिनांक 21 नोव्हेंबर रोज शुक्रवार सकाळी श्री खंडोबा मंदिर येथे यात्रा संयोजन समितीच्या व गावकऱ्यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी कुस्त्यांची भव्य दंगल यात्रा संयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. कुस्त्यांच्या डावाचा मान श्री सुधाकर गुरुजी गणलेवार यांच्या घरून काढण्यात येणार आहे.तर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रेतील जागरण, पालखी सोहळा, महाप्रसाद, कुस्तीच्या दंगलीत सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन यात्रा संयोजन समिती व उंद्री प. दे गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






