स्वराज्य वार्ता / कुलदीप बिनगे
परतूर प्रतिनिधी : सध्याच्या काळात प्रत्येकजण तणावात आहे. १०० टक्के निरोगी कुणीच नाही. त्यावर एकच औषध आहे, ‘रामनाम’ नामस्मरण. हा सर्व हिंदू संप्रदायांचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा,त्यामुळे तणावातून मुक्तता व स्वतःची,देशाला प्रगतीही मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील प्रसिद्ध कीर्तनकार,आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.

ते दिनांक १० नोव्हेंबर रोजी दिंडी सोहळ्या निमित्त कणसे परिवाराच्या वतीने दैठणा हरेराम नगर येथे आयोजित भव्य कीर्तन महोत्वाच्या निमित्ताने समस्त समाज बांधवांना प्रबोधन करत होते.

पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की, संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानाच्या माध्यमातून सर्वांना उपदेश केला; म्हणून ते वयापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ ठरतात. माऊली हे ज्ञानियांचे ज्ञानी आहेत. मुक्तपणे आपल्या माणसांजवळ व्यक्त व्हा. मोकळेपणाने बोला. त्यामुळे मानसिक ताण अल्प होतो. सध्या आपण घरातल्या घरात तसेच शेजार्यांशी बोलत नाही; पण मनःशांती मिळण्यासाठी सर्व जुने विसरून एकमेकांशी बोला,असे आव्हान त्यांनी केले.

कणसे परिवाराचा आदर्श घ्यावा
दर वर्षी प्रमाणे परंपरे प्रमाणे सलग ६६ व्या वर्षी सुद्धा कोणताही खंड न पडता आपल्या कणसे परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या परंपरेला कोणताही फाटा न देता, न चुकता भव्य अश्या कीर्तन दिंडी सोहळा साजरा करतात म्हणून समाज बांधवांनी कणसे परिवाराचा आदर्श घेऊन असे कार्यक्रम आयोजित करून आदर्श निर्माण करावा असे आवाहन ही यावेळी मान्यवरांकडून करण्यात आले.

यावेळी परतूर तालुक्यातील गुणवंत वादक गायक मृदंगाचार्य वारकरी मंडळ सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजक — शत्रुघ्न कनसे यांनी सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







