श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर माळकौठा येथील काकडा आरतीचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती वडजे

मौजे माळकौठा ता. मुदखेड येथे पवित्र अशा कार्तिक मासात एक महिना चालणाऱ्या काकडा आरतीचा आज दि.०६-११-२०२५ रोजी गुरुवारी सांगता सोहळा उत्साहात संपन्न झाला, गेली अनेक वर्षापासून चालू असलेल्या परंपरेला अनुसरून मोठ्या भावभक्तीने गावातील भाविक भक्त मंडळी नित्य नेमाने संपूर्ण महिनाभर दररोज रात्रीला मंदिराची सजावट करून पहाटे ०५ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे श्री रोकडेश्वर भजनी मंडळ हे काकडा भजनाला सुरुवात करतात व गावातील दररोज एका सदभक्ताच्या यजमानाच्या शुभ हस्ते विश्वचालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा व आईसाहेब देवी रुक्मिणी माता यांचा महाभिषेक संपन्न करून. भगवंताची महाआरती केली जाते व जमलेले भाविक भक्त माता भगिनी लहान थोर अतिशय शिस्तीत रांगेत श्रींचे दर्शन घेतात. जमलेल्या भाविक भक्तांच्या सेवेकरता यजमानाच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे सकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात येते. उपस्थित सर्व भाविक भक्त मंडळी उद्याने भगवंताचा महाप्रसाद सेवन करतात.अशा ह्या संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीची सांगता आज कार्तिक कृ.प्रतिपदेला हर्ष उल्हासात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.त्यात आज पहाटे पाच वाजता आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव ह.भ.प.व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर व श्री रोकडेश्वर भजनी मंडळ यांनी भजनाला सुरुवात केली आणि श्री रोकडेश्वराचे पुजारी गुरुवर्य महारुद्र महाराज जोशी यांच्या वेदमंत्र घोषामध्ये सौभाग्यवती सरोजनी मुत्तेपवार व श्रीमान दत्तात्रय सावकार मुत्तेपवार यांच्या शुभहस्ते भगवान श्री पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी माता यांचा महाभिषेक संपन्न झाला. त्यानंतर भगवान परमात्म्याची महाआरती करण्यात आली. व श्रीमान दत्तात्रय शंकरराव मुत्तेपवार यांच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते ,जमलेल्या सर्व भाविक भक्त माता-भगिनीं महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल