स्वराज्य वार्ता / प्रतिनिधी राम राठोड
छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनच्या फलकाजवळ तरुणांनी लघुशंका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर वारंवार काहीतरूणाकडून धमक्या येत होत्या तसेच सोशल मीडियावरून हे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या या त्रासाला कंटाळून तरुणांनी आत्महत्या केली ही घटना बुधवारी परतुर तालुक्यातील ढोकमाळ तांडा येथे घडली महेश संजय आढे वय 27 असे मृत तरुणाचे नाव आहे काही दिवसापूर्वी मृत महेश आणि त्यांचा मित्र हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनच्या फलकाजवळ लघुशंका करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला होता या घटनेनंतर महेश आणि त्यांचा मित्राने माफी मागूनहि व्हिडिओ शेअर केला होता तरीही वारंवार काही तरुण महेश ला फोन करून धमक्या देत होते या त्रासाला कंटाळून अखेर महेश आडे यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणात महेश याला त्रास देणाऱ्या तरुणाविरुद्ध रात्री आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







