स्वराज्य वार्ता / किरण पाटील मुक्ताईनगर
जळगाव: अखिल भारतीय विविध कल्याणकारी मंच आणि भोईसमाज पंच मंडळ शहादा च्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय,पालक प्रबोधन आणि बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून श्री एस ए भोई यांनी जमलेल्या समाजबांधवांना संबोधित केले.
ते पुढे म्हणालेत की,
असंख्य पोटजाती मध्ये विभागल्या गेलेल्या आणि 400 कुळांमध्ये वाटल्या गेलेल्या तसेच 36 जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या भोई समाजाने आपला दायरा वाढवून लग्न संबंध जोडावेत आणि समाजाच्या एकसंघतेचा पाया मजबूत करावा वयात आलेल्या उपवर मुलामुलींचे लग्न आणि समाजात वाढत चाललेली बेरोजगारी या दोन ज्वलंत प्रश्नांवर विचार मंथनातून प्रबोधन व्हावे आणि या समस्यांतून मार्ग निघावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पालकांना नवनवीन स्थळांची माहीती व्हावी आणि योग्य वयात लग्न जुळावीत यासाठी उपवर मुलामुलींचा बायोडाटा पीडीएफ स्वरुपात विनामूल्य उपलब्ध करून देण्याची सेवा
प्रा एम टी खेडकर यांच्या संकल्पनेतून सुरु झाली आणि ही सेवा विस्तारीत होवून हजारो स्थळांची नोंदणी झाली.
खेडकर सरांनी सुरू केलेली ही सेवा आता “अखिल भारतीय भोईसमाज विविध कल्याणकारी मंच” च्या माध्यमातून एक चळवळ बनली असून या प्रयत्नांना समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
कल्याणकारी मंच च्या ऑनलाइन विनामूल्य व मोफत सेवेच्या व्हाट्सएपच्या व पीडीएफ पुस्तक च्या माध्यमातून 800 पेक्षा जास्त लग्ने जुळलेली आहेत व अनेक संसार सुखी झालेत.विविध कुळात ,लांब अंतर मध्ये ही लग्न जुळणी सुरू आहे.काही पालक माहिती देत नाहीत,नाहीतर आकडा मोठा ही होऊ शकतो.या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने मंच ची गरीमा उंचावली.तसेच अनेक प्रभावशाली वक्त्यांनी सभामंडपाला संबोधित करून मार्गदर्शन केले.बी जी आवले,रविंद्र ढोले (मालेगांव),
अशोक वाडेकर (जळगांव),गोपाळ धारपवार (पनवेल),हरिदास कोमटवर (नांदेड),सुरेश तायडे,अर्जुन भोई (मुंबई),भाई दास मोरे,सी एम भोई,गुलाब भोई,(शिरपूर),देविदास मोरे (पनवेल),सुनिता लाडकर (ठाणे), सतिष फुलपगारे (धुळे),
संतोष शिंगाणे(सुरत)
मथुराताई सुरजूसे (अमरावती),रविंद्र मोरे (पालघर),महेंद्र सोनवणे,विकास खेडकर (नाशिक)
आदी मान्यवरांनी उपस्थित राहून स्टेज ची शोभा वाढवली.भोई गौरव या मासिक चे संपादक आणि नागपूर येथील साहित्यिक प्रकाश लोणारे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटन आणि संघर्षाचे महत्व विशद केले.
रोजगाराच्या संधी शोधल्या पाहीजेत तसेचपालकांनी तडजोड करण्याची मानसिकता ठेवली पाहीजे असे ही लोणारे सर म्हणालेत.निवृत्त अधिकारी अशोक वाडेकर म्हणालेत की, आजच्या काळात अशा कार्यक्रमांची समाजाला खूप गरज असल्याचे सांगून
स्वयंरोजगारासाठी,नव उद्योजकांना येणा~या अडचणींवर महाराष्ट्र भर मार्गदर्शन करण्याची ग्वाही त्यांनी दिली.प्रा माधव कदम सरांनी ओघवत्या शैलीत आणि ओजस्वी स्वरात आपले प्रबोधन मांडले. शिकलेल्या पाल्यांनो जास्त चव मधे पडू नका,
डोळे उघडा झापडी लावून बघू नका,आपल्याच दृष्टिकोणात राहू नका.शिक्षण पाहू नका तर
कर्तृत्व पहा,तुम्ही जेथे काम करत असाल तेथे तेथे
जे जे चांगले करता येईल ते चांगले करा.असे सकारात्मक विचार आपल्या मांडलेत.जेष्ठ पत्रकार प्रा दत्ता वाघ सरांनी लग्न जुळवतांना सकारात्मक विचार करुनच निर्णय घेण्याचा सल्ला दिला.तर मुलीच्या आईच्या अपेक्षा अनेक ठिकाणी अवाजवी असल्याने लग्न जुळायला अडचणी येतात अशी खंत व्यक्त केली.चणे फुटाणे,डांगर मळे आणि मच्छीमारीत अडकलेला भोईसमाजाचा तरुण आजच्या काळात सर्वच क्षेत्रात काम करतोय हे चित्र आशादायक असल्याचे ही प्रा दत्ता वाघ सर म्हणालेत..महात्मा गांधी नॅशनल प्राईड अवार्ड ने सम्मानित आयडियल टिचर अर्जून भोई आपल्या भारदस्त आवाजात म्हणालेत की,समाज भोई म्हणून एकत्रित येत नाही.ठराविक कुळांमध्ये लिमिटेड असल्याची मानसिकता समाजासाठी दुर्दैवी आहे.अपेक्षांचे ओझे वाहत असतांना आजच्या पालकांची दमछाक होत आहे.दबाव वाढविणा~या मानसिकतेतून कुटूंब च्या कुटूंब बेचिराख होत आहेत.निवृत्त प्राचार्य आणि जिज्ञासा फाउंडेशनचे संचालक प्रा ईश्वर चौधरी म्हणालेत की, विचाराने अपरिपक्व असलेले मुलं मुली आजकाल स्वत:च आपापले जोडीदार निवडतात आणि नंतर पश्चाताप करतात.
आजची लेटेस्ट टेक्नोलॉजी देशाच्या सिमारेषे पासून तर आपापल्या घरापर्यंत आली आहे,दुनियां बदलत आहे त्यानुसार तुम्हाला स्वताला अपडेट राहावे लागेल.
चिंता करू नका इतर जातीपातीमधे लग्न लावण्याचे प्रमाण वाढणारच आहे.
फक्त पालकांच्या मर्जीशिवाय निर्णय घेवू नका.
रोजगाराच्या संधी आहेत पण त्या शोधाव्या लागतील असे ही त्यांनी आपल्या संबोधनात सांगितले.पालघर येथून आलेले विविध पुरस्कारांचे मानकरी आणि मंच चे मार्गदर्शक चे रविंद्र मोरे म्हणालेत की, विचार मांडण्या पेक्षा आणि भाषण देण्यापेक्षा कृती वर भर देणे अधिक श्रेयस्कर आहे असे सांगत त्यांनी कृतीचे महत्व पटवून देणारे विचार आपल्या भाषणातून मांडलेत.मथुराताई सुरजूसे यांनी आपल्या मनोगतात पालकांनी तडजोड स्विकारावी असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वधूवर परिचय पीडीएफ, ऑनलाईन स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्याच्या दुस~या सत्रात सभामंडपात वधूवर परिचयाचा तर दुस~या मंडपात विविध कंपनीचे आलेले अधिकारी वर्गाने बेरोजगार तरुणांच्या मुलाखती घेतल्या.या मेळाव्यासाठी 350 उपवर वधूवरांनी नांवे नोंदली होती त्या पैकी 40 युवक युवतींनी परिचय मंचावर येवून दिला.वधूवरांचे परिचयाचे सेशन कल्याणकारी मंचचे राहुल शिंगाणे यांनी हलके फुलके विनोद करत हसत खेळत कंडक्ट केले.यावेळी अनेक पालकांनी देखील आपल्या मुलामुलींचा परिचय स्टेजवर येवून दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा संजय खेडकर आणि चंद्रकांत शिवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन आर डी मोरे सरांनी मानले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






