स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी उपविभागीय कार्यालय येथे ओबीसी भटके विमुक्त महासंघाच्या वतीने 2 सप्टेंबर 2025 च्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके सर बोलत होते. परतुर येथे रेल्वे स्टेशन पासून ते तहसील कार्यालय पर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.मंडल आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागासपण दूर करण्यासाठी देशातील मागास जातींना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून इतर मागासवर्ग प्रवर्गात आरक्षणाची तरतूद झाली. बारा बलुतेदार 18 आलोतेदार यांना सामाजिक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे व त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे हा या आरक्षणाचा मुख्य उद्देश यातून कुठेतरी या बलुतेदारांचे प्रतिनिधी शिक्षण, नोकऱ्या आणि राजकारणात प्रतिनिधित्व करू लागले पण 2 सप्टेंबर 2025 च्या शासन आदेशानुसार मूळ ओबीसीची चे अस्तित्व शासनाने धोक्यात आणले आहे. त्या अनुषंगाने सरकारने जरी आरक्षण धोक्यात आणले असले तरी परंतु उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एससी, एसटी यांना या आरक्षण मध्ये घटकांना सोबत घेऊन सर्वसाधारण च्या जागावर सुद्धा निवडणूक लढवेल व दोन सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय म्हणजे मूळ ओबीसी प्रवर्गासाठी काळा कायदा आहे. अशा प्रकारचे वक्तव्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी केले आहे. याप्रसंगी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे, श्रीमती सविताताई मुंडे प्राध्यापक विठ्ठल तळेकर बटुळे मामा यांनीही मार्गदर्शन केले याप्रसंगी करवंडे सर परमेश्वर खरात अशोकराव गाव सौंदर्य मधुकर झरेकर भागवत कडपे परमेश्वर पोटे सुभाष जाधव डॉक्टर त्रिभुवन नामदेव नाचन शेख जमीर परमेश्वर ढवळे तुकाराम जईद बाळू गाते राधाकिसन माने रुस्तुमराव कुंड माऊली हजारे सुनील पोटे सिद्धार्थ पोटे गोरख गोटे अमोल आगळे, बाबासाहेब झरेकर बाळ आनंद गाढवे अभिमन्यू गाढवे ओम प्रकाश गाढवे गणेश आंबेकर सुदर्शन राऊत शिवाजीराव इंगळे इतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक श्री रामप्रसाद थोरात सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर पोटे यांनी केले शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री पद्माकर गायकवाड साहेब यांनी निवेदन स्वीकारले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







