परतूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने भव्य दिव्य शेतकरी मोर्चा :- महेश भैया नळगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला

स्वराज्य वार्ता परतूर प्रतिनिधी 

शेतकरी पुत्रांनो यापुढे कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती अस म्हणत जा – लक्ष्मण वडले

शेतकरी पुत्रांनो, आपला बाप राष्ट्र आणि देश चालवण्यासाठी कर्जबाजारी झालाय, त्यामुळे तो काही गुन्हेगार नाही म्हणून आज पासून कर्जमाफी द्या असे न म्हणता कर्जमुक्ती द्या असे म्हणत जा. असे अवाहन उबाठा शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना केले. परतूर येथे ते मराठवाड्याचा हंबरडा या आंदोलनात मार्गदर्शन करत होते.
उबाठा चे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आज मराठवाडाभर हंबरडा आंदोलन झाले. याचाच भाग म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर येथे छत्रपती शिवाजी नगर चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चार्चे आयोजन केलं होते.
या प्रसंगी वडले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे ८ हजाराचे सोयाबीन ३ हजारावर आणले म्हणजे पाच हजार रुपये क्विंटल कमी मिळाले. याउलट खतं, बि-बियाण्याचे भाव दुप्पट वाढले. आणि आमच्या सर्वाचं मालाचे भाव निमपट झाले तरीही शेतकरी जागा होत नसेल तर हा वर्ग मेलेला व मृत आहे का ? असा प्रश्न पडतो.

सरकारी बाबू महाराष्ट बंद करून दाखवतील
सरकार ने सरकारी वर्गातील अधिकारी व क्रमाचारी यांच्या पगातून हज़ार रुपये कपात कातरून दाखवावे.
दुसऱ्याच दिवाशी हे सरकारी बाबू महाराष्ट बंद करून दाखवतील. शेतकरी हा जाती धर्माच्या नावावरर बंद करतो मात्र त्याने काळ्या आईच्या नावावर बंद करायला हवा. नाहीतर तुम्हा-आम्हाला मरावच लागेल. ज्यावेळेस काळी आई पिकल त्याचवेळेस तुमचे आमचे भलं होईल. सरकारने फक्त आरक्षणाचे खुळखुळे हातात दिलेले आहेत. काळया आईला प्रतिष्ठा दिली तरच भलं होईल आणि पोट भरणार आहे.

फडणवीस ने आंदोलने पेटवले व शेतकऱ्यांना हरवले
मुखमंत्री देवेंद्र फडणवीस याने मागील काही वर्षांपासून मराठा, धनगर, बंजारा, आदिवासी आदी समाजानाचे आंदोलने पेटवले व महागाई, रोजगार सारखे प्रश्न झाकून ठेवले यामुळे शेतकरी हरवला. हेच मुख्यमंत्री या आधी कर्जमाफी करणार असे तीनदा म्हणाले होते, अजित पवार हे चक्की पासिंग पासिंग असं म्हणाले होते. आता पवारांना उरावर घेतली. या तीन लुटारू टोळ्या आहेत. यांनी राज्याला व देशाला लुटलेय.
या सरकारने १२ लाख कोटी माफ केले मात्र यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता आले नाही. त्यामुळे आता हंबरडा मोर्चाचे काढलाय. यापुढे यांना खेटराचीच भाषा काळात असेल तर खेटर मोर्चाचे काढण्याचे नियोजन करा. असा सल्ला जिल्हाप्रमुख यांना दिला.

शासकीय अधिकारी हे घरगडी , आमदाराला विचार एवढे श्रीमंत कसे झालात ?
तहसीलदार, एसडीएम, बीडीओ, जिल्हाधिकारी हे सत्ताधाऱ्यांचे घरगाडी असल्यासारखे काम करत आहेत. बांधवानो तुमच्या आमदाराला विचारा मागील २०-२५ वर्षांपूर्वी तुमची परिस्थिती काय होती व आज तुम्ही एवढे श्रीमंत कसे झालात ?

उसावाले ३-३ तर काटा मारतात
कारखानदार हे उसाच्या ट्रक व ट्रॅक्टर मागे ३-३ टन वजनाचे काटा मारायलेत. मोजून ऊस नेऊन पहा ते तुमचा ऊसच घेणार नाहीत. तसेच उसाची रिकव्हरी ३ ने कमी दाखयलेत. म्हणजे यामध्ये जवळपास १२०० रु. ट्रॅक्टर मागे शेतकऱ्याना लुटतात. असा थेट आरोपही वडले यांनी केला.

न्यायधिशांवर बूट फेकणारा जर मुस्लिम असता तर गल्ल्या जाळल्या असत्या
मा. न्यायधिश गवई साहेबांवर काल परवा एकाने बूट फेकून मारला. त्याचे काय झाले ? काहीही होणार नाही कारण तो त्यांचाच आहे. त्याच्या जागी जर एखादा मुस्लिम असता तर त्याला आतंकवादी घोषित करून देशातील गल्ल्या जाळल्या असत्या. असेही वडले म्हणाले.

आयुष्यात पहिल्यांदा शेतकऱऱ्यांच्या मालातील कपात करणारा मुख्यमंत्री पहिला – नळगे

आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्याच्या माला मधूनच १५ रु. कपात करून मदत करणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पहिला. असे याप्रसंगी जिल्हाप्रमुख नळगे म्हणाले

फोटोजिवी व डुबुकउड्या मारणारा आमदार
एकीकडं अतिवृष्टीने चार गावं पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतातुर होते. मात्र आमदार हे गुडघाभर पाण्यात डुबुकउड्या मारून फोटो काढण्यात व्यस्त होते. चारही निवाऱ्याच्या ठिकाणी ५०-५० लोकं राहत होते. अनेक शेतकरी हे यांच्या फोटो मुळे गावकुसाजवळ रोडवर झोपलेले होते. या सर्वांना आसपासच्या शेतकऱ्यांना व जनावरांना जगवले. आता हेच आमदार व प्रशासन याच शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत – महेश नळगे

यांची होती उपस्थिती
या हंबरडा मोर्चाचे प्रसंगी उपनेते लक्ष्मण वडले, मराठवाडा युवा सेना प्रमुख धर्मराज दानवे, जिल्हाप्रमुख महेश लांडगे, मनसे जिल्हाप्रमुख प्रकाश बापू सोळंके, काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते एकनाथराव कदम, उबाठा उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम, अशोकराव आघाव, तालुका प्रमुख भारतराव पंडित, मंठा तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र काळे, विठ्ठल वटाणे,संजय नागरे, देविदास खरात, विजय बोरुडे, मंठा विभागप्रमुख आशारामजी बोराडे , शिबवाजी मोरे, परतूर शहरप्रमुख दत्ता सुरुंग, मनसे तालुकाप्रमुख कृष्णा सोळंके यांच्यासह काँग्रेस, उबाठा व मनसे चे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यासाठी केले हंबरडा आंदोलन.. मागण्या –
१) अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी.
२) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करा.
३) पिक विम्याचे निकष तातडीने शिथिल करून पंचनामेची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
४) अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुन्या निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला द्या. आदी मागाण्यांचे विवेदन
उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांनी स्विकारले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल