मानवत येथील राज बेलदार समाज बांधवांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

मानवत येथील समाजसेवक शेख सत्तार शेख सरवर बेलदार , मोहम्मद युनुस शेख जमाल राज,शेख अब्दुल शमीम अब्दुल रहेमान  राज,महम्मद अनीस महम्मद ईसाक राज , अब्दुल मुखीन अब्दुल खय्युम राज , सय्यद मुस्तखीम तय्यब बेलदार यांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ही घोषणा राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि राज यांच्या  वतीने करण्यात आली आहे.
उत्कृष्ट कार्य करून राज बेलदार समाजात नवचैतन्य निर्माण केले बिकट परिस्थितीवर मात करून आपली पाल्ये उच्चशिक्षित करून डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक शिक्षक वकील उत्कृष्ट उद्योजक निर्माण केले राज बेलदार समाजाला प्रतिष्ठान मिळून दिल्याबद्दल यांच्या तळमळीची व जिद्दीची दखल घेऊन राज बेलदार समाजसेवा मंडळाचे वतीने सदरील मानवत येथील समाज बांधवांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे
या पुरस्काराचे वितरण दिनांक २४ ऑक्टोबर २०२५  शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता परभणी येथील दरगाह रोडवरील मास्टर कॅफे येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे
कार्यक्रमास परभणी जिल्ह्यांचे पालकमंत्री मेघना दिदि बोर्डिकर , आमदार राहुल पाटील , खासदार संजय उर्फ बंडु जाधव , बेलदार समाजाचे मार्गदर्शक सय्यद नजमुल हसन , मा. राज्यमंत्री सुरेश वरपुडकर ,कार्यकारी अध्यक्ष अब्दुल्ला राज , युवानेते वसीम बेलदार , बळीरामजी अरगडे ,जिल्हाध्यक्ष  सय्यद अबुजर हुसैनी , उपाध्यक्ष सय्यद विखार ईलाहि , महाराष्ट्र संघटक  मुस्तखीम बेलदार , समाजसेवक साजेद बेलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मानवत येथील राज बेलदार समाज बांधवांची निवड झाल्याबदल या निवडिचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मानवत तालुका अध्यक्ष  असीरखान ,उपाध्यक्ष महम्मद इद्रिस , सचिव शेख करिम  कोषाध्यक्ष महम्मद मुस्तकिम, सल्लागार सय्यद मोबीन राज तसेच सदस्य अय्युब राज, शेख ईस्माईल , शेख एजास ,मोहम्मद सुलतान मौलाना ,अब्दुल अजीस , अब्दुल अजीम , एकबाल राज आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल