सर्मपित स्वयंसेवक घडवणे संघाच ध्येय -प्रशांत कुलकर्णी 

स्वराज्य वार्ता / कुलदिप बिनगे

परतूर :- या राष्ट्रावर आलेल्या प्रत्येक आपतीवर व समस्यावर सर्मपणभावाने धावुन जाणारा स्वयंसेवक तयार करणे संघाच काम आहे असे प्रतिपादन प्रशांत कुलकर्णी यांनी केले ते रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले,रा.स्व.संघावर गेल्या 100 वर्षात अनेक टिका सहन कराव्या लागल्या परंतु या राष्ट्राला परम वैभवाला नेण्याचे ध्येय समोर ठेवुन डाँ.हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली.डाँ.हेडगेवार स्वतः स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी होते कलकत्ता मधील क्रांतिकारी गटाचे ते सदस्य होते.स्वातंत्र्यनंतर हिंदुची काय अवस्था होईल असा दुरगामी विचार करुन संघाची स्थापना केली.आज संघाच्या माध्यमातून अनेक सेवा प्रकल्प चालवले जातात आणि याच सेवाकार्याच्या आधारावर संघ शताब्दी वर्ष पुर्ण करत आहे.येणाऱ्या काळात स्वयसेवकांना विविध अभियान रावबुन संघाचे पुढे न्यायचे आहे आणि राष्ट्रला परम वैभवत्व प्राप्त करुन देण्याचा जबाबदारी स्वयंसेवकाची आहे.

प्रमुख पाहुणे डाँ.गोपीकिशनजी बांगड यांनी Rss म्हणजे राष्ट्र,सेवा आणि स्नेह राष्ट्राची सेवा करत जनतेच स्नेह प्राप्त करुन संघ शताब्दी साजरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संघाचा विजयदशमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.400 गणवेषधारी स्वयंसेवकाच्या शिस्तबद्ध संचलनाव्दारे शहराचे वातावरण संघमय झाले होते.संचलन मार्गावर मातृशक्तीव्दारा रांगोळी काढुन व पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले.

 

 

व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रशांत कुलकर्णी,डाँ.गोपीकिशनजी बांगड व परतुर तालुका संघचालक डाँ.प्रमोद आकात उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल