स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
या नाटकास आष्टी सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी मधुकर मोरे रोहन वाघमारे
आष्टी: परतूर तालुक्यातील आष्टी येथे आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आष्टी येथील मोरंगेश्वर मंगल कार्यालात बुद्धभूमी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित व प्रकाश वाघ निर्मित ‘मी रमाई’ एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले असून भारतातील हे पहिले एकपात्री नाटक असून ते माता रमाबाई आंबेडकरांच्या धाडसी जीवनावर आधारित आहे, या नाटकाच्या माध्यमातून रमाबाईंचे रडणारे नव्हे, तर परिस्थितीशी दोन हात करणारा जिवन प्रवास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.यात या वर्षीच्या माता रमाई आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखिका व रमाबाई आंबेडकर यांच्या मुख्य भूमिकेत सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे या आहेत… त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत आम्ही जरांगे,डिलिव्हरी बॉय, प्रेमवारी, मालिका-बाळूमामाच्या नावानं चांगभलं,ज्ञानेश्वर माऊली,साता जन्माच्या गाठी,अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत महाराष्ट्र भर प्रेक्षकांनी प्रचंड आत्तपर्यंत या नाटकास दाद मिळाली असुन डोळ्यासमोर जणु जिवंत माता रमाई यांचा जीवनपट पाहण्याचा अनुभव या नाटकातून होत असल्याने या नाटकास आष्टी सह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद मिळणार असल्याचे नाटक आयोजन समितीचे आष्टीचे सरपंच मधुकर मोरे, गोळेगावचे सरपंच उद्धव,डोळस रोहन वाघमारे,गौतम शेळके शिवाजी डोळस,यांच्या वतीने सांगण्यात येत आहे तरी परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






