स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अस्तित्व फाउंडेशन पिंपरी चिंचवड आकुर्डी पुणे यांच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आली तसेच मागे झालेल्या ढगफुटीमुळे काही लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे अन्नधान्य पाण्यामध्ये खराब होऊन गेले असता अस्तित्व फाउंडेशन पिंपरी चिंचवड आकुर्डी पुणे यांच्या माध्यमातून आज दिनांक 4/10/2025 रोजी गोरगरिबांना अन्नधान्याची व वस्त्र वाटप करण्यात आले यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच कृषी उत्पन्न बाजार मार्केट समितीचे उपसभापती श्याम भाऊ धर्मे, माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर धर्मे, शिवसेना नेते प्रल्हाद भाऊ गिराम, भीमराव गिराम, सुदाम धर्मे, रामा धर्मे, शेख हकीम, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






