स्वराज्य वार्ता / सुनिल गायकवाड
आष्टी, 1 ऑक्टोबर 2025 – प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल च्या 10 वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाच्या निमित्ताने आयोजित नवरात्र उत्सवाचा पाचवा वर्ष अत्यंत भव्यता आणि उत्साहात साजरा केला. हा अनोखा कार्यक्रम आष्टी शहरात प्रथमच होम मिनिस्टर या संकल्पनेवर आधारित प्रियदर्शनी फंक्शन हॉलमध्ये आज संपन्न झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थी, महिला, महिला पालक व युवतींचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच शाळेच्या परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नवरात्र उत्सवाच्या पारंपरिक रंगात रंगलेले सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या विजेत्या महिलांना पैठणी साडी बक्षीस देण्यात आले.
प्रथम क्रमांक सावित्रा गणेश थोरात यांना पैठणीचा बहुमान मिळाला व द्वितीय क्रमांक डॉ. अर्चना शिवशंकर उमरे (मॅडम) यांना द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले .प्रियदर्शनी इंग्लिश स्कूलची 10 वर्षांची शैक्षणिक वाटचाल ही केवळ अभ्यासातील यश नाही तर सांस्कृतिक मूल्यांच्या जोपासनेचीही गाथा आहे. या नवरात्र उत्सवाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व परंपरांबद्दल आदर निर्माण करण्याचा उद्देश साध्य केला जात आहे. शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल ही लावण्यात होते. आष्टी शहरात प्रथमच होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जो नावीन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे.
आष्टी परिसरातील स्थानिक समुदायाने या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री अंभुरे यांनी केले. त्याच बरोबर दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी संस्थाचालकांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल च्या पूर्ण स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






