शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या रुद्र लोखंडे ला वेटलिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

कल्याण शहरातील लालचौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेमध्ये इयत्ता १० वी ब च्या वर्गात शिकत असलेल्या रुद्र विष्णू लोखंडे या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयोजित शालेय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान संपादित केला आहे . शालेय स्तरावरील या स्पर्धेमध्ये त्याने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.या सुवर्ण यशाबद्दल त्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख, पर्यवेक्षिका सुरेखा पाटील , सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. शारदा मंदिर संस्थेच्या वतीनेही त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. या अगोदर सुद्धा त्याला अनेक वेळा यश मिळाले आहे. रुद्र विष्णू लोखंडे उंबर्डे गावात राहतो. भरत दळवी सरांनी त्यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व स्तरावर त्याचे अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल