महावीर चौक येथे दुर्गामाता नवरात्र उत्सव सुरु असतानाच शेजारी घाणीचे साम्राज्य;

स्वराज्य वार्ता / अतुल जगताप

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी शहरातील महावीर चौक येथे दुर्गामाताचे अधिष्ठान असून नवरात्र हा हिंदू धर्माचा मोठा उत्सव असून दुर्गामातेच्या आरती साठी मोठ्यासंख्येने महिला, पुरुष, व लहान मुले येत असतात साधारण आरती अर्धा तास ते पाऊण तास चालते पण जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातुन अतिशय घाण दूरगंधी येत असून त्या घाणीमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

तर पुढील बाजार रोडच्या देवीच्या आरतीला हा घाणीचा ढिगारा पायी तुडवून जावे लागते व याचं मार्गांवरून दसऱ्याच्या दिवशी पालखी देखील जाते ग्रामपंचायतच्या वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली पण ग्रामपंचायत कडून कसली ही दाखल घेतली जात नाही.

ही हिंदू बांधवांसाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आता सरकार हिंदुचे असताना ही अवस्था मग पुढारी फक्त हिंदुत्वचे राजकारण करण्यासाठीच का असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांना पडला असून हा प्रश्न फक्त महावीर चौक येथीलच नाही तर आष्टी शहरातील अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतं आहे. तर आष्टी ग्रामपंचायत व स्थानिक हिंदू पुढऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी हा हिंदू धर्मातील मोठा उत्सव म्हणजे दुर्गामाता नवरात्र आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल