स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
आष्टी ग्रामपंचायत च्या मार्फत पहाणी करून करण्यात आले पंचनामे
परतूर तालुक्यातील आष्टी येथे शुक्रवारी रात्री वादळी वार्यासह अतिवृष्टीच्या पाऊस कोसळला. दरम्यान आष्टी येथील अनेक घरे कोसळली आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, मंडाबाई लिंबाजी वैद्य व कमल भीमराव फड उषा सुभाष रेंगाडे आसाराम शंकरराव थोरात यांचे नुकसान झाले आहे.परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शुक्रवारी रात्री अचानक वातावरणात बदल होवून वादळ वार्यासह पाऊस कोसळला. यात मंडाबाई वैद्य व कमल फड उषा रेंगाडे आसाराम थोरात यांचे घर कोसळल्याने यात त्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी डी बी काळे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी पठाण साहेब व ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात ग्रामपंचायत सदस्य मारोती थोरात ग्राम रोजगार सहाय्यक अर्जुन थोरात ग्रामपंचायत सदस्य अझहर शेख ग्रामपंचायत सदस्य असेफ कच्ची यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.व शासना मार्फत मदत करून देऊ अशे आश्वासन ग्रामविकास अधिकारी डी बी काळे यांनी दिले आहे आष्टी ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की सद्यस्थिती पाहता अतिवृष्टी होत असून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी नदी, नाले, ओढे यांच्याजवळ जाण्याचे टाळावे.पूरग्रस्त भागात अनावश्यक फिरू नये पिण्याचे पाणी गाळून व उकळूनच वापरावे. विजेची उपकरणे, विद्युत तारा किंवा ओले खांब यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.घरामध्ये आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी व धान्याचा साठा ठेवावा प्रशासनाकडून सूचना मिळाल्यास त्वरित त्यांचे पालन करावे. धोक्याची परिस्थिती जाणवली तर त्वरित ग्रामपंचायत/स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.असे आव्हान आष्टी ग्रामपंचायत मार्फत आष्टीतील नागरिकांना करण्यात येत आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






