आमदारानी एक वर्षे मानधन न घेता संकटवेळि शेतकऱ्यांना 8300 रुपये ऐवजी हेक्टरी 50,000 हजार रुपये आर्थिक मदत करुन आपली जनसेवा दाखवावी चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी चंपत डाकोरे

महाराष्ट्र राज्यभर ढगफुटी सारखा पाऊस नांदेड सहित संपुर्ण महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सर्व जिल्हात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या घराचे, पिकांचे, जनावरांचे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेली 8300 रुपये हेक्टरी ही मदत अल्प असून हेक्टरी 50,000 रुपये एवढी मदत द्यावी शासनाच्या तिजोरी रिकामी असल्यामुळे शासनाने गतवर्षी जी मदत होती ती कमी केली ? अशा परिस्थितीत मतदार मालकांना आधार देणे गरजेचे आहे. ज्या वेळी मतदान येते त्यावेळी आम्ही जनतेचे दिनदुबळ्याचे कैवारी म्हणून मते घेताना मतदारांना लोकप्रतिनिधी आमदार यांनी प्रचार करुन निवडणुकीत विजयी होतात.
सत्तेत गेल्यानंतर संकटकाळी अतिवृष्टिमुळे *शेतकऱ्याचे नुकसान होते ते गतवर्षि मिळणारे नुकसान भरपाईची रक्कम कमी होते.तेच आमदारांना मिळणारे वेतन ईतर भत्ते कसे कमी होत नाहित?* शासनाच्या तिजोरीत रक्कम नसताना *कर्ज काढुन आमदारांचे मानधनात वाढ होते?* तेच मतदार मालकांसाठी का होत नाही?
या सर्व गोष्टिचा लक्षपुर्वक आमदारांनी विचार करून त्यांना मिळणारे दरमहा लाखो रू.मानधन अशा संकटवेळि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी म्हणून *आमदारांनी एक वर्षे मानधन न घेता शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५०,०००रू तिनं हेक्टर पर्यंत मदत करूंन आपल्या मतदार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा* असे आवाहन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल