दौंड : उसने पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांवर दौंड शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणी योगेश माने यांनी फिर्याद दिली आहे .
निखिल श्रीकांत रणदिवे व निखिल आप्पा साबळे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत .दौंड येथील दौंड पाटस रोडवरील मनिषा लॉज च्या पाठीमागे असलेल्या गॅरेज जवळ बुधवारी (ता.२४) रात्री ११ वाजता ही घटना घडली या बाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल श्रीकांत रणदिवे व निखिल आप्पा साबळे यांनी योगेश याच्याकडे बुधवारी रात्री 11 वाजता फिरायला जाण्यासाठी 5 हजार रुपये उसने मागितले .मात्र योगेशने उसने पैसे देण्यास नकार दिला या कारणावरून निखिल रणदिवे आणि निखिल साबळे यांनी रागाच्या भरात योगेश ला हातानी लाथाबुक्क्यांनी स्टीलच्या पाईपने तसेच कंबरेचा पट्ट्याने मारहाण केली .याबाबतची तक्रार योगेश माने याने दौंड शहर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर निखिल रणदिवे व निखिल साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस हवालदार महेंद्र गायकवाड करत आहेत.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







