स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
हिंदी पखवाडा 2025 च्या औचित्याने पी.एम.श्री.केंद्रीय विद्यालय नांदेड च्या वाचनालयात रंगीबेरंगी सजलेल्या पुस्तकांच्या रांगा ज्ञानाने उजळलेल्या, आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत कुतूहल, उत्साह झळकून एक आगळे वेगळे वातावरण निर्माण झाले होते.याचे कारण म्हणजे भव्य हिंदी पुस्तक प्रदर्शन होते.या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात होऊन मान्यवर पाहुणे विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक विश्वकर्मा आणि मुख्याध्यापक श्री.राम श्रृंगारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व पुस्तकप्रेमींचे प्रेरणास्थान असलेल्या ग्रंथगुरू डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला.पुस्तकांच्या विश्वात एक अद्भुत प्रवास विद्यार्थ्यांची वाट पाहत होती. कथा,कविता,कादंबऱ्या,चरित्रग्रंथ, बालसाहित्य,करिअरविषयक पुस्तके, ज्ञानकोश म्हणजे हिंदी साहित्याचा संपूर्ण खजिना असे सर्व एकाच छताखाली विद्यार्थ्यांसाठी खुला झाला होता.प्राचार्य सरांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हटले की,
“पुस्तके म्हणजे ज्ञानाचे अनमोल दालन आहे,विद्यार्थी जितके वाचतील तितके त्यांचे विचारविश्व विस्तारेल, हिंदीसारख्या सशक्त भाषेतील वाचनामुळे त्यांची अभिव्यक्तीही अधिक ताकदवान होईल.”
तर मुख्याध्यापक श्रृंगारे सरांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की,
“हिंदी साहित्य वाचनाने आपण फक्त भाषेच्या जवळ जात नाही तर आपल्या संस्कृतीच्या मुळांशीही नाते जोडतो.”या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ग्रंथालय प्रमुख डॉ.मितेश हनवते सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.कारण त्यांच्या परिश्रमामुळे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने वाचनाचा महोत्सव ठरले.
विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात फेरफटका मारताना अनेक पुस्तके हाताळली, काहींच्या पानांत डोकावले,आणि ज्ञानाच्या या मेजवानीत डुबून गेले. खरंच वाचनालयात त्या दिवशी केवळ पुस्तकेच नव्हे तर ज्ञान,आनंद आणि उत्सुकतेचा उत्सव खुलला होता.
या सोहळ्यासाठी विद्यालयातील शिक्षक श्रीमती.प्रिया भगत,श्री. गुलशनकुमार हंस,श्री.कपिलदेव घोबळे,श्री.दत्ता बढले,श्री.जितेंद्र मदन श्री.पुलगम रमेश,श्री.अबुल महमिद एन.मोहम्मद,श्री.नंदलाल कुशवाह, श्री.नरेंद्र कुमार सुथार,श्री.परमेश्वर भुर्के,श्री.जितेंद्र दिलीप मदन,श्री. अविनाश यादव,श्रीमती.शिवानी,श्री. कैलाश मोहनकर,श्री.दीपक कुमार, श्री.नरेंद्र वर्मा,श्रीमती कुमारी पूजा, श्री.संगळे डी.ए,श्री.रमेश कदम,श्री. श्रीनिवास कालदुर्गीकर,श्री.रविंद्र खराटे,श्री.मोहसिन ए.हाई,श्री.मारोती दुक्रे,श्रीमती जयश्री कांबळे,कु. पल्लवी फुलसे,श्रीमती दीपिका,श्री. मुनेश्वर,श्रीमती सोनिया,श्री.प्रशांत शेकोकर,डॉ.मितेश हनवते,श्रीमती रंजू चव्हाण,श्रीमती पूजा कदम,श्री. नितीन मुळे,श्री.सुनील सूर्यवंशी,कु. दुर्गा मॅडम,श्री.नागसेन धवळे,कु.वर्षा, कु.विभा कुलकर्णी,कु.प्रीती खंदारे, श्री.नागराज चवरे,श्रीमती सविता ताकसांडे,कु.सांंची लोणे,श्री.मस्नाजी आदि उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एकच स्वर काढला की “हे पुस्तक प्रदर्शन प्रत्येक वर्षी भरवले पाहिजे!”आणि खरंच,या अनुभवाने सिद्ध केले की पुस्तकांपेक्षा मोठा मित्र आणि शिक्षक दुसरा कोणीही नाही.अशाप्रकारे हा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






