विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा स्वागतच; आपल्या गावासह देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावावा- आमदार बबनराव लोणीकर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला मोठे भगदाड! केंधळी व नेर येथील मुस्लिम पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश

लोणीकर पिता-पुत्रांच्या विकास कामांवर विश्वास; इतर पक्षात संधी आणि सन्मान मिळत नसल्याची प्रवेशकर्त्यांची खंत

प्रतिनिधी – कुलदीप बिनगे

भाजपचे दरवाजे राष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुले आहेत. आज प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या गावाचा तालुक्याचा पर्यायाने देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावावा अशी भावना या प्रवेशावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षांच्या गडाला मोठे भगदाड पाडले आहे.

आमदार बबनराव लोणीकर यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन लोणीकरांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

मंठा तालुक्यातील केंधळी व जालना तालुक्यातील नेर येथील पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टी प्रवेश केला यासाठी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे उपसभापती नागेशराव घारे, तालुका अध्यक्ष विक्रम उभार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड, पंडितराव घारे जगन्नाथ घारे यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी शत्रुघ्न कणसे, संपत टकले, रमेश भापकर, ज्ञानेश्वर शेजुळ यांची प्रमुख उपस्थिती होती केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विकासात्मक धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार बबनराव लोणीकर भाजपा महाराष्ट्र प्रदेशाची राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास असून केवळ घोषणा न करता, प्रत्यक्ष कामे होत असल्यामुळे भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मध्ये स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना योग्य सन्मान व संधी मिळत नसल्याची खंत देखील प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली.

आमदार बबनराव लोणीकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची मजबूत संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांना मिळत असलेला सन्मान पाहून आपण भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला असेही यावेळी प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रवेशामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची जमिनीवरील पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी केंधळी येथील :

शुभम घारे योगेश राऊत अंकुश बनसोडे निलेश देशमाने सौरभ घारे पुंजाराम चौधरी शिरीष घारे विकास घारे कृष्णा काकडे योगेश चौधरी गजानन गाढवे ज्ञानेश्वर घारे महेश घारे संदीप चौधरी सोपान सुरडकर दिनेश घारे आदित्य घारे रामदास खरड नवनाथ घाटे विकास घारे बाळासाहेब आमटे दिग्विजय अवचार सोमेश घारे शिवराज घारे किशोर चौधरी संतोष खताळ श्रीनिवास खरड तुषार बनसोडे मंगेश घारे ज्ञानदेव वायाळ दत्ता पडूळ बळी मिरगे राजेश राऊत अक्षय राठोड कृष्णा राठोड राजेश चव्हाण रंजीत राठोड मिथुन राठोड नितीन राठोड रवी राठोड प्रवीण चव्हाण रोहित जाधव जीवन चव्हाण राहुल राठोड संदीप राठोड रमेश चव्हाण रवी राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.

नेर येथील मुस्लिम बांधवांचा भाजपात प्रवेश

बाबा भाई शेख बाबा भाई पठाण अलीम शेख अकबर शेख जमीर शेख इस्माईल पठाण शकील शेख हुसेन सय्यद मुक्तार शेख आरशात पठाण आयास पठाण इमरान शेख सलमान शेख अरबाज पठाण साजिद पठाण सिकंदर मौलाना पाशा शेख रामभाऊ तांदळकर रफिक मौलाना यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल