विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळेची कौतुकास्तव कामगिरी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकवले गोल्ड व सिल्व्हर मेडल

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

टिटवाळा कल्याण डोंबिवली महानगरपालिका सांस्कृतिक व क्रीडा विभाग आयोजित सन २०२५-२६ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळेने मान पटकावला आहे. दिनांक १९/०९/२०२५ रोजी झालेल्या तायकॉदो स्पर्धेत इयत्ता दहावी ब चा विद्यार्थी कुमार अनुज देशमुख याने सतरा वर्षे वयोगटात सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. तसेच १४ वर्षाखालील कुस्ती या क्रीडा स्पर्धेत इयत्ता सातवी ब चा विद्यार्थी कु. सक्षम भोईर याने गोल्ड मेडल मिळवून विभाग स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. दोघांचेही सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेल्या सक्षम भोईर यास विभागीय स्पर्धेसाठी तसेच पुढील वाटचालीसाठी विद्या मंदिर शाळा क्रीडा विभाग कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत..

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल