एक लाख एकवीस हजार युनिटची वीज चोरी ६६ जणांवर महावितरणाची कडक कारवाई

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

टिटवाळा कल्याण ग्रामीण विभागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणास कळताच महावितरणाने मोठी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार सहाय्यक अभियंता निलेश शिर्के शाखा अभियंता तुकाराम घोडविंदे, धनंजय पाटील, सचिन पवार, योगेश चेंदवणकर यांनी पथक तयार करून जुलै व ऑगस्ट महिन्यात वीज मीटर तपासणी करण्यात आली तेव्हा वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये मीटर असूनही तसेच अनधिकृत पणे व सर्विस वायर मध्ये छेडछाड करून ६६ जणांनी चोरीने वीज वापर केल्याचे निदर्शनास आले. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीचे मूल्यांकन केले असता. ३० लाख ७३ हजार रुपयाची १ लाख २१ हजार युनिटची वीज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. सदर कारवाई कल्याण ग्रामीण विभागातील टिटवाळा, इंदिरानगर, गणेशवाडी, बल्याणी या भागात करण्यात आली आहे. विज चोरी सिद्ध झाल्यास दंडात्मक व कठोर कारावासाची शिक्षा विज कायद्याअंतर्गत करण्यात येईल अशी माहिती महावितरणा कडून देण्यात आली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल