स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव्
टिटवाळा मांडा पूर्व पश्चिम येथे नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक नागरी समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन सुविधा ज्यात मांडा टिटवाळा परिसरात एल आर सी ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांची कमतरता असल्यामुळे पूर्ण शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात लोकवस्ती वाढत असल्याने पुढे भविष्यात तुटवडा होऊ नये म्हणून काळू नदीवरील केटी बंधारा वाढवणे संदर्भात तसेच जे जलकुंभ दुरुस्ती अथवा बंद आहेत ते सुरू करावेत तसेच अमृत योजनेअंतर्गत मांडा पश्चिम येथील रेल्वे लाईन क्रॉस करून पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत देखील चर्चा झाली.आरोग्य विभाग पूर्णतः मांडा टिटवाळा परिसरात दुर्लक्ष होत आहे असे निदर्शनास आणून दिले आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या संकल्पनेतील दवाखाना जो टिटवाळा जकात नाका येथे तयार स्थित असून तो त्वरित सुरू करावा. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांना जलद गतीने पझेशन द्यावे आणि ज्यांना पोझिशन दिलेले आहेत त्यांच्या मालमत्तेचा दुरुस्ती करून द्यावे तसेच टिटवाळा स्टेशन ते स्वामी विवेकानंद चौक निमकर नाका येथे अनधिकृत फेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापलेला आहे तो मोकळा करून द्यावा. दळणवळण परिवहन सेवा ही सुरळीत करावी टिटवाळा कल्याण रिंग रोड चे काम लवकर पूर्ण करून तो रस्ता सुरू करावा. महापालिकेत तब्बल 15 ते 20 वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे करोड रुपये खर्च करून देखील व्यवस्थित विकास कामे दिसत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये जो असंतोष आहे त्यासाठी या अधिकाऱ्यांचे आणि कामांचे लेखापरीक्षण व्हावे ही मागणी देखील करण्यात आली.तसेच गणेशोत्सव काळात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांच्या निवेदे बाबत देखील आपण योग्य ती तपासणी करावी. अशा सर्व समस्यांच्या बाबत मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांना भेटून निवेदन दिले आहे तसेच या समस्यांच्या बाबतीत सखोल चर्चा केली. त्यात लेखी निवेदन देऊन पाहणी दौरा आयोजित करण्याबाबत विनंती केली त्यावर आयुक्त महोदय यांनी सकारात्मक उत्तर दिले. यावेळी शिवसेना कल्याण उप-शहर प्रमुख श्री. विजय (भाऊ) मारुती देशकर यांच्यासोबत नगरसेवक जयवंत भोईर साहेब, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेठ मिश्रा, उपशहर संघटक महिला सुषमाताई शर्मा, शाखाप्रमुख अशोक चौरे, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मढवी, शिवसैनिक नरेंद्र पाटील, महिला उपशाखा संघटक श्रेयाताई जाधव, गटप्रमुख सुशील जाधव,अभि नरके पाटील आदी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






