आष्टीत विजेचा लपंडावाने नागरिक हैराण

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

बाप्पाया गल्ली भागातील दररोज लाईट गुल होत असल्या मुळे नागरिक त्रस्त

अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर वीजसुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे. आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे विजेशिवाय चालूच शकत नाहीत. टीव्ही, मोबाईल, फॅन, कुलर, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वाहने आणि उपकरणे विजेशिवाय चालूच शकत नाही. विजेचा वापर आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतच चालली आहे. मात्र परतूर तालुक्यातील आष्टी मध्ये या अत्यावश्यक सेवेचा तीनतेरा वाजले आहेत.गेल्या १ ते २ महिन्या पासून दररोज पहाटे आष्टी शहरातील बाप्पाया गल्ली भागातील वीज बंद होत आहे. पहाटे पहाटे वीजपुरवठा बंद होत असल्यामुळे आष्टी शहरातील नागरिक हैराण झाले आहेत.दररोज वीज जात असल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर आदी उपकरणे बंद पडत आहेत. याचा आर्थिक फटका विनाकारण ग्राहकांना बसत आहे. पहाटे कधी ४ वाजता तर कधी पहाटे ५ वाजता वीज जात असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. ग्राहकांना वीज बिले वेळेत दिली जातात. पैसे नाही भरले तर मीटर कापून नेले जाते. वीजपुरवठा बंद केला जातो. मात्र, ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरूनसुद्धा ग्राहकांना महावितरणतर्फे विजेची चांगली सुविधा मिळत नसल्याने   आष्टी मधील जनता महावितरणच्या कारभारावर प्रचंड प्रमाणात नाराज आहेत.

दररोज पहाटे आष्टी शहरातील बाप्पाया गल्ली भागातील वीज घालवली जाते. त्याचा नाहक त्रास बाप्पाया गल्लीतील जनतेला होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत आहे. महावितरणतर्फे नियमितपणे, अखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे.अशी मागणी बाप्पाया गल्लीतील नागरिकांकडून  होत आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल