स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगेवाड सपोनि गणेश सुरवसे उपनी अजित चाटे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या वतीने गौरव करण्यात आला
परतूर तालुक्यातील आष्टी पोलिसांनी केलेल्या चांगल्या तपासामुळे गुन्हेगारास न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. आष्टी पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनी कारवाई मुळे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या वतीने आष्टी पोलिसांचा केलेल्या या प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.दरम्यान, आष्टी पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल या गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी सपोनी सचिन इंगेवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्याकडे सोपवला. पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी तीन दिवस सलग १२०० कि.मी. पेक्षा जास्त प्रवास करून या गुन्ह्यातील आरोपीस उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आली. या गुन्ह्यात मजबूत असे दोषारोपपत्र आष्टी पोलिसांकडून न्यायालयात सादर केले प्रत्येक साक्षीदार यांची नीट पडताळणी करण्यात आली. प्रत्येक साक्षीदार पंच यांना वेळेत न्यायालयात पाठवून त्यांचा पाठपुरावा करून वेळेत गुन्हा शिक्षेपर्यंत पोहचवण्यात सपोनी गणेश सुरवसे यांना यश आले. या गुन्ह्यात नवीन कायद्यानुसार आरोपीस २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हा सर्व तपास उपनिरीक्षक अजित चाटे यांनी पूर्ण केला. गुन्ह्यात पाठपुरावा करून शिक्षा मिळवून दिली. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे तसेच तत्कालीन गुन्हा दाखल करताना प्रभारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, तपासात सहकार्य केले म्हणून सपोनि. डोलारे, पोना. काळे पोहेकों. जावेद शेख यांचा विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






