स्वराज्य वार्ता प्रतिनिधी – राम राठोड
परतूर : निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा,लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्रप्रदेशातील बंजारा,लंबाडा जातीना अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र १९४८ नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा सह विदर्भ खानदेशचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मुळचे असलेले अनुसुचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येवून विमुक्त जातीच्या संवर्गात रुपांतरित करण्यात आले.
त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जि आर काढून जाहीर केले आहे. त्याला अनुसरुनच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करुन अनुसूचीत जमातीचे एस टी चे आरक्षण देण्याची मागणी गोरसेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
यासाठी गोरबंजारा समाजाने सातत्याने संघर्ष पुकारला असून त्यांना न्याय देण्यासाठी बापट आयोग,इधाते आयोग,भाटीया आयोग डिएनटी एस टी आयोगाने महाराष्ट्रातील गोरबंजारा हा अनुसुचित जमातीचे आरक्षणाबाबत सकारात्मक शिफारशी करुनही त्यांना ते आरक्षण देण्यात आलेले नाही. .डोंगर दर्यात राहणारा समाज आजही आदीम समुदायाची सर्व पात्रता पूर्ण करतो कारण स्वतंत्र बोली,भाषा,पेहराव,धाटीपरपंरा, स्वतंत्र तांडावस्ती,खानपान,स्वतंत्र असूनही त्यांना एस टी आरक्षणा पासून जाणीवपूर्वक टाळले जात आहे.
अनुसूचित जमातीचे आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत रामराव महाराज सह अन्य समाजसुधारकांनी सातत्याने प्रयत्न केले असून -गोरसेना या बंजारा समाजातील अग्रगण्य संचटनेने गेल्या विस वर्षापासून मोर्चा आंदोलने केलेली आहेत. मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू होते.
त्या धर्तीवर गोरबंजारा समाजासाठी सुद्धा तेच गॅझेट लागू करुन एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी गोरसेनेने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी मार्फत केलेली आहे. परतूर तालुक्यातील बंजारा समाज संपूर्ण बंजारा समाज व गोर सेनेचे पदाधिकारी हजारो च्या संख्येने उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







