स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणा संदर्भात आवश्यक कागदपत्रांच्या उपलब्धतेआठी कुणबी नोंदीच्या दस्ताऐवजाची मागणी सकल मराठा समाज, मुखेड यांच्या वतीने दि. १० सप्टेंबर रोजी मुखेड तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नुकत्याच राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅजेट स्वीकारण्यात आले आहे. मुखेड तालुक्यातील बराचसा भाग हा निजामकाळात सध्याच्या तेलंगणा राज्यात असल्याने तेथील आदिलाबाद, मुधोळ आणि इतर ठिकाणी मराठा बांधवांच्या कुणबी जातीच्या नोंदी उपलब्ध आहेत.
या पार्श्वभूमीवर मुखेड तहसील कार्यालयामार्फत १८८१ चा गाव नमुना खासरा, १९६४ कर पत्रक आणि १९६७ पूर्वीची नोंदी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या दस्तऐवजांच्या आधारे समाज बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन सकल मराठा समाज, मुखेड यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले असून, त्याच्या प्रती विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी, नांदेड आणि उपजिल्हाधिकारी, देगलूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






