स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री येथे दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी वाजत – गाजत मोठ्या उत्साहात उंद्री नगरीचा राजा म्हणून संबोधले जाणाऱ्या श्री गणेश बाळ मित्र मंडळ मंडळांची स्थापना करण्यात आली असून दररोज गावातील प्रतिष्ठित मान्यवर शुभ हस्ते गणपतीची पुजा व महाआरती करण्यात येत होती.
श्री गणेश बाळ मित्र मंडळ मंडळाच्या समोर दररोज सायंकाळी कीर्तन भजन ,व लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दररोज आयोजन केले जात होते. सलग नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर दि.५ सप्टें. २०२५ रोजी सकाळी
दहाव्या दिवसाची गणपतीची पुजा व महाआरती गावातील महिला भजनी मंडळीने भजन करत आनंद घेतले
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थाचे मुखेड तालुकाध्यक्ष मारोती गणेशराव पाटील वडजे, यांच्या हस्ते पार पडल्या श्री गणेश बाल मित्र मंडळ त्यांच्या तर्फे खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गावातील भाविकांनी महा प्रसादाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे .तर दुसरीकडे मात्र शेवटी दुपारची पुजा व महाआरती गावातील आकाश पाटील वडजे, श्रीराम पाटील वडजे, मारोती पाटील मटके, भास्कर पाटील वडजे, रजीत पाटील सूर्यवंशी, बालाजी पाटील भोकरे, बालाजी पाटील सूर्यवंशी, नारायण सावकार दाचावार, विठ्ठल पाटील माहेगाय भजनी मंडळ होतेआवाज भाग, त्यांच्या हस्ते झाल्यानंतर श्री बाल गणेश मित्र मंडळाच्या आरती नंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून जल्लोषात गणपतीचे विसर्जन करुन गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. यावेळी , प्रतिष्ठित मान्यवर, पक्ष पदाधिकारी ,कार्यकर्ते, व श्री गणेश बाळ मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह इतर कार्यकर्ते, युवा तरुण व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






