वलखेड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी हनुमंत दवंडे

परतुर तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला .आपले मतलक्ष्मण बिल्हारे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की ‘
शिक्षक दिनाची सुरुवात 1962 मध्ये झाली. जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांच्या वाढदिवसाला विशेषरीत्या साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डॉ. राधाकृष्णन यांनी सुचवले की, त्यांच्या वाढदिवसाऐवजी हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्यात आला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तमिळनाडूच्या तिरुत्तनी येथे झाला होता. त्यांना तत्वज्ञानात विशेष गती होती आणि त्यांनी म्हैसूर विद्यापीठासह अनेक शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापन केले. ते १९५२ ते १९६२ पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि १९६२ ते १९६७ पर्यंत दुसरे राष्ट्रपती होते. शिक्षणाबाबत त्यांची दूरदृष्टी आणि योगदानामुळे ते एक आदर्श शिक्षक आणि प्रेरणास्थान ठरले.
शिक्षक दिन साजरा करण्यामागील उद्देश फक्त शिक्षकांना सन्मान देणे एवढाच नाही, तर तो आपल्याला हेही आठवण करून देतो की शिक्षक हे आपल्या आयुष्याला दिशा देणारे मार्गदर्शक असतात. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या चारित्र्य घडणीत आणि समाजाची भक्कम पायाभरणी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
या दिवशी देशभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो. विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात. काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षक बनून वर्ग घेतात, तर शिक्षक विद्यार्थ्यांची भूमिका पार पाडतात.
आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड येथे आपण गेल्या ४ वर्षांपासून ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सत्कार मान सन्मान करुन शिक्षक दिन साजरा करण्यात येत असल्याचे शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.लक्ष्मण बिल्हारे यांनी सांगितले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.खवल सर, पाईकराव सर, ईरले सर,वावरे सर, सुनील सुरुंग सर, श्रीमती. तनपुरे मॅडम, श्रीमती.रुद्रे मॅडम यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला तसेच शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.लक्ष्मण बिल्हारे यांनी योग्य व पारदर्शक पद्धतीने शाळेचा सर्व व्यवहार व व्यवस्थापन नियोजन केले त्याबद्दल त्यांचाही सत्कार गावकरी व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आला.
यावेळी श्री.श्रीहरी सुरुंग (मा.सरपंच), श्री.आसारामजी सुरुंग, श्री.अमोल सुरुंग (तालुका प्रमुख शिवसेना), गजानन वाटाणे, बाळासाहेब डव्हारे, विजय गिरी, सुरुंग,सतिष सुरुंग, रमेश सुरुंग,सतिष बिल्हारे, कृष्णा सुरुंग पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे शिक्षक मा.श्री.पाईकराव सर यांनी सर्व गावकर्यांचे आभार व्यक्त करुण कार्यक्रमाचा समारोप केला

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल