उंद्री येथील नवतरुण गणेशाचे थाटात विसर्जन

स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री येथे दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी वाजत – गाजत मोठ्या उत्साहात उंद्री नगरीचा राजा म्हणून संबोधले जाणाऱ्या श्री नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली असून दररोज गावातील प्रतिष्ठित मान्यवर शुभ हस्ते गणपतीची पुजा व महाआरती करण्यात येत होती.
श्री नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर दररोज सायंकाळी कीर्तन भजन ,व लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दररोज आयोजन केले जात होते. सलग नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर दि.५ सप्टें. २०२५ रोजी सकाळी
दहाव्या दिवसाची गणपतीची पुजा व महाआरती गावातील
भाजपचे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यभान , पाटील, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थाचे मुखेड तालुकाध्यक्ष मारोती गणेशराव पाटील वडजे, उन्द्री नगरीचे पोलीस पाटील सविता विजयकुमार वादे, यांच्या हस्ते पार पडल्या ज्ञानेश्वर सुर्यभान पाटील वडजे त्यांच्या तर्फे खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गावातील भाविकांनी महा प्रसादाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे .तर दुसरीकडे मात्र शेवटी दुपारची पुजा व महाआरती गावातील माधवराव तुकाराम पाटील वडजे त्यांच्या हस्ते झाल्यानंतर श्री नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ व श्री बाल गणेश मित्र मंडळाच्या आरती नंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून जल्लोषात गणपतीचे विसर्जन करुन गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. यावेळी उंद्री नगरीचे लाडके नेते मा. सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे , व गावातील विद्यमान सरपंच, पोलिस पाटील, प्रतिष्ठित मान्यवर, पक्ष पदाधिकारी ,कार्यकर्ते, व श्री नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह इतर कार्यकर्ते, पोलिस कर्मचारी, युवा तरुण व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल