शिक्षण आणि खेळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक: इमरान राही

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

शिक्षण आणि खेळ एकत्र असणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक कौशल्य, शिस्त, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. तसेच ताण कमी होते आणि शिकण्याची प्रतिक्रिया अधिक आनंदी होते त्यामुळे शिक्षणात खेळाचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान रही यांनी व्यक्त केले.ते 30 ऑगस्ट रोजी लॉन्स ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशन द्वारा शहीद हुतात्मा स्मारक येथे आयोजित प्रमाणपत्र व बेल्ट वितरण सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर सेंट थॉमस इंग्लिश शाळेचे प्रचार्य प्रीती सत्यम, लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष विजय सत्यम, आष्टीडू आखाडा असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन मोहिते, लॉयन्स स्टेडिशनल कराटे डो असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव कोशी उल्हास वाघ, सामाजिक कार्यकर्ता कुमारी फिजा खान, फौजिया खान, लीला वाघ प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.कोशी उल्हास वाघ म्हणाले की खेळांमुळे मुलांचे शरीर मजबूत होते त्यांच्या सहनशक्ती वाढते आणि शारीरिक आरोग्य सुधारते. तसेच नेतृत्व गुण, टीमवर्क आणि शिस्त यासारखी महत्त्वाची जीवन कौशल्य विकसित होतात. या प्रसंगी फौजिया खान, विजय सत्यम तर प्राचार्य प्राचार्य प्रीती सत्यम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची प्रस्तावना मोहन मोहिते, संचालन सिहान सहिल वाघ तर आभार लिला वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मिहिर वाघ, प्रेम कंवर, केवल्य सागरकर, आर्यन छापेकर आदी लोकांनी अथक परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल