स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
23 ऑगस्ट (पाथरी) पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रांच उर्दू पाथरी जिल्हा परभणी मध्ये आज महाराष्ट्र राज्य शासनाचे दोन उपक्रम आनंदायी शनिवार आणि उर्दू वाचन 3.0 यशस्वीरित्याने रबण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून “आनंददायी शनिवार” हा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग, ध्यान, आपत्ती व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, आणि समस्या निराकरण यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू करण्यात आला आहे आणि त्यासाठी राज्य शिक्षण मंडळ (SCERT) ने कृतीपुस्तिका देखील तयार केली आहे. थोडक्यात, हा उपक्रम विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक आणि भावनिक कौशल्ये शिकवण्यावर भर देतो, ज्यामुळे ते अधिक जबाबदार आणि सुजाण नागरिक बनतील.
शाळेत आज मैदानावर विद्यार्थ्यांच्या सामूहिक परिपाठ नंतर कवायत आणि योगासने घेण्यात आले. वैयक्तिक स्वच्छता अंतर्गत विद्यार्थी वर्ग मंत्री मंडळाद्वारे मैदानावर सर्व विद्यार्थ्यांचे केस, नख आणि दातांची तपासणी करण्यात आली व त्याबद्दल सूचना देण्यात आले. वर्गणी आहे विद्यार्थी उपस्थिती नोंदणीनंतर मिशन निपुण परभणी कृती खेड अंतर्गत एक खेळ घेण्यात आला. पारंपरिक सण पोळा निमित्त इकबाल अन्सारी सरांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याने विद्यार्थ्यांना शेती शेतकरी आणि बैलांबद्दल आणि त्यांच्या महत्त्व बद्दल माहिती करून दिली. उर्दू वाचन 3.0 अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयातून विविध गोष्टींचे पुस्तक घेऊन मूक वाचन केले. त्यांच्यासोबत सर्व शिक्षकांनी सुद्धा मूक वाचन केले. आज शनिवारी शाळेची तक्रार पेटी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे समक्ष उभारण्यात आली ज्यामध्ये शून्य तक्रार होते.हे सर्व उपकरण यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक जमील सिद्दिकी , फहिम अन्सारी, अब्दुल रहमान, मोहम्मद अब्दुल्ला, सय्यद अब्दुल बारी, हुमेरा अन्सारी आणि फराह खान खूप परिश्रम घेतला. आणि अशाप्रकारे आजच्या आनंदायी शनिवार राबविला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






