ग्रांमपंच्यायत कार्यालय येणोरा परतूर. जि जालना येथे बालकांच्या विविध प्रश्नाबाबत गावातील नागरिक, पालक, बालक, महिला मंडळ यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले

परतूर : येणोरा ता. परतूर येथील बालकांच्या शिक्षण, आरोग्य व सुरक्षेच्या विकासाच्या दृष्टीने विविध प्रश्न निर्माण झाले असून मुले जीवनावश्यक सुविधा पासून वंचित झाली आहेत. शाळेत जाणारा मुख्य रस्ता व शाळा परिसर मोठे खड्‌डे पडून चालण्यास धोकादायक झाला आहे. शाळेची इमारत पावसाने गळत आसून मुलांना बसण्यास योग्य नाही, शाळे समोर पानी साचते त्यामुळे मुलांना वर्गात सुद्धा जाता येत नाही. शाळा परिसरात जुनी पाण्याची टाकी जीर्ण झाली असून पडण्याची भीती आहे. अंगणवाडी कार्यालय सकाळी 9 ते 2 वेळेत सुरू राहते चौचालय नसल्याने आंगांवडी कार्यकर्तीसह बालकांची गैर सोय होत आहे, अंगणवाडीत वीज जोडली नसल्याने पंखे नाहीत. लहान मुलांना मच्छर, डास चावतात, अंगणवाडीत रेकॉर्ड ठेवण्यासाठी कपाट नाही.

मुलांसाठी धोकादायक ठिकाणे दुरुस्त करण्यात यावेत काही अनुचित प्रकार घडल्यास ग्रांमपंच्यायत व समंधित पदाधिकारी जबाबदार राहतील या संदर्भात दिनांक /20/08/2025 रोजी पालक, बालक व ग्रामस्थांच्या वतीने ग्रांमपंच्यायत कार्यालय येणोरा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे,

या वेळी सरपंच कांचन जोगदंड व ग्रामसेवक श्री बरकुले यांनी निवेदन स्वीकारले व पुढील काही कालावधीतच या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रमुख मागणाया

1 शाळा परिसरात पाणी सचल्याने मुलांना शाळेत जाता येत नाही. सदर परिसरातीलड्डा बुजून दुरुस्त करावा.

2 गावातील मुख्य रस्ता खड्‌डे पडून मुलांना चालण्यासाठी धोकादायक झाला आहे, सदरर स्ता मुलांना शाळेत जाण्याजोगा करून यावा .

3 अंगणवाडी 1 व 2 मध्ये सौचालय

4 शाळापरिसरात दारू पिनार्यावर कार्यवाही करण्यात यावी.

5 शाळा परिसरात जुनी पाण्याची टाकी धोकादायक झाली. असून पाडण्यात यावी.

6 अंगणवाडी क्र. 1 समोरील लाईटच्या डी.पी. समोर सुरक्षा भिंत बांधून देण्यात यावी.

7 अंगणवाडीत रेकॉर्ड ठेवण्यसाठी कपाट, किचन सेट, धान्य ठेवण्यसाठी कोठ्या, मुलांना खेळण्यासाठी प्ले किट देण्यात यावी.

शाळेची इमारत पावसाने गळत असून किंमती शैक्षणिक साहित्य पाण्याने भिजून खराब होत आहे. मुलांना शाळेत बसता येत नाही सदरील इमार दुरुस्त करण्यात यावी.

8) 0 ते 3 वयोगटाठी देण्यात येणारा T. H.R. आहार खाण्या लायक नाही. सदरील आहार बंद करून खाण्यालायक पौष्टिक आहार देण्यात यावा.

ग्रामसेवक व इतर सेवा दाते यांचे गाव भेटीचे वेळा पत्रक ग्रांमपंच्यायत

9 मुलांसाठी मदत करणारे चाइल्ड हेल्पलाइन व इतर हेल्पलाइन नंबर अंगणवाडी कार्यालय ग्रामपंचायत व गावातील इतर ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात यावे इत्यादी मागण्याची निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर शिक्षण तज्ञ भास्कर साळवे ,भागवत भुंबर,तौर जानेश्वर जिजाभाऊ,भुंबर अशोक , संतोष सराउत,संतोष दादाराव मुंबर, सखाराम गायकवाड, अशोक दवंडे, मीरा साळवे रेखा पाटील भारत साळवे वंदना साळवे इत्यादी सह गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत व गावातील युवक तरुण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल