चिलपिंपरी ता. मुदखेड येथे “गोकुळ अष्टमी”दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी शुक्रवारी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशत्कोत्तर सुवर्ण महोत्सवी ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व पालखी सोहळा मोठ्या थाटात सायंकाळी ठिक ०५ व ०७ या वेळेत पालखी सोहळा व जयंती उत्सव करण्यात आला. त्यावेळी उपस्थित गावातील भजनी मंडळी, संपूर्ण गावातील महिला मंडळ, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, विविध मान्यवर , गावातील सरपंच, उपसरपंच ,तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून चिलपिंपरींचे ग्रामविकास अधिकारी चिलीमोड साहेब हे पण होते मोठ्या उत्साहामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काढण्यात आला आहे. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य मुखेड तालुका अध्यक्ष श्री मारोती पाटील वडजे उंद्रीकर यांनी दिली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






