स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी:-तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून अनेक वर्ष सेवा बजावलेले कै.डॉ.भास्करराव रघुनाथराव टेंगसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव किडनी स्पेशालिस्ट डॉ.राहुल भास्करराव टेंगसे व डॉ.अमित भास्करराव टेंगसे यांनी रेणापूर जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना आधुनिक व डिजिटल शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळेला ४० हजार रुपये किमतीचा ५३ इंची अँड्रॉइड स्मार्ट एलईडी सोमवार ११ ऑगष्ट रोजी सप्रेम भेट दिला.
यावेळी डॉ.राहुल टेंगसे यांनी शाळेतील प्रत्येक वर्गास भेट देऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच मुलांनी क्रीडाक्षेत्र व कला क्षेत्रात जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख दीपक टेंगसे, भगवानराव टेंगसे,कृष्ण हारके, गणेश टेंगसे,दिगंबर जोशी बाळासाहेब टेंगसे,आदिनाथ टेंगसे,अशोक टेंगसे,बंडू पवार, शंकरराव टेंगसे, मुरलीधर रोकडे, हरिभाऊ उजगरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर बी किरवले, सर्व शिक्षक इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार श्री नेताजी वागाळे यांनी मानले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






