वाटूर फाटा येथे पारंपरिक तीज महोत्सवाचे आयोजन – बंजारा समाजात उत्साहाचे वातावरण

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी राम राठोड 

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक तीज महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, या उत्सवात परिसरातील सर्व बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक बंजारा समाजाच्या पोशाख, लोकगीत, नृत्य आणि बंजारा लेगी संस्कृतीचे दर्शन घडवणारा तीज महोत्सव साजरा केला जात आहे. महिलांचा विशेष सहभाग असून, तीज निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

“बंजारा संस्कृती जपूया, तीज महोत्सव साजरा करूया!” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या महोत्सवात सहभागी होऊन समाज एकतेचा संदेश देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
उद्देश: गोर बंजारा संस्कृतीचे जतन करणे.
प्रमुख कार्यक्रम आणि तारखा:
तीज पेराणी (पेरणी): शनिवार, २ ऑगस्ट २०२५, दुपारी ३:०० वाजता, मोहन आडे यांच्या निवासस्थानी, बंजारा सदन, वाटूर फाटा येथे.
ढबोली (मेजवानी आणि मिरवणूक): रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:०० ते २:०० वाजेपर्यंत मेजवानी आणि दुपारी ३:०० ते ५:०० वाजेपर्यंत शंभू महादेव विद्यालय, वाटूर फाटा येथे भव्य मिरवणूक.
तीज तोडणी (तीज तोडणी): सोमवार, ११ ऑगस्ट २०२५, सकाळी ११:०० वाजता.
सर्व समाजातील सदस्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कुटुंब आणि मित्रांसह कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल