स्वराज्य वार्ता साठी किरण पाटील
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका अज्ञात व्यक्तीने बाहेरपुरा येथील रहिवासी जावेद खान रशीद खान च्या मालकीची दुचाकी रात्रीच्या वेळेस लॉक करून बाहेर घरासमोर लावलेली होती. रात्री च्या एक सव्वादोनच्या सुमारास हिरो कंपनीची मोटर सायकल क्र.एम. एच. 19डी. ए.8719 या गाडीला जाळले. गाडीला जेव्हा मोठी आग लागली व धूर निघाला तेव्हा शेजारी राहणाऱ्यानी जावेद खानला जागे केले. सर्वं शेजारी मिळवून आग विझवण्यात आली. तेव्हा त्या मोटर सायकलचा काहीच हिस्सा शिल्लक बाकी राहिलेला नव्हता. पोलीस प्रशासनाकडे याची तक्रार नोंद केलेली आहे. पोलिसांनी स्पॉटवर येऊन पंचनामा केला पुढील तपास पोलीस हेट कॉन्स्टेबल व त्यांची टीम करीत आहे .याअगोदरही अशीच दुचाकी जाळण्याची घटना घडलेली होती वाड्यामध्ये पेट्रोल चोरीच्या घटना बऱ्याच वेळा घडल्या .गावात चोरीच्या घटना वेळोवेळी होत आहे पोलीस प्रशासनाने याकडे देखील तातडीने लक्ष देण्याची गरज आहे .त्यासाठी गावात रात्री अकरा बाराच्या नंतर गावात पोलीसांनी गस्त लावायला पाहिजे व रात्री पोलीसांनी पेट्रोलिंग करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेस अशा चोर भामट्यांना आळा बसेल.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






