स्वराज्य वार्ता प्रतिनिधी सुनील गायकवाड
दिनाक ११/८/२०२५ रोजी परतूर-मंठा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करन्यात आले. परतूर मंठा तालुक्यातील विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.दोन्ही तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांचा होत असलेला राजकीय वापर,शेतकरी कर्जमाफी,मग्रारोहयो सिंचन विहिरीना मंजुरी,यावर्षीच्या अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे,शिक्षण विभागातील चुकीच्या नेमणुका,शेत रस्ते,शिव रस्ते,पांदन रस्ते तक्रारींचा राजकीय दबावाखाली होत असलेला निर्णय व गैरकारभार,वंचित घरकुल धारकाना रेतीची उपलब्धता,मंठा मंडळ व परतूर तालुक्यातील विविध मंडळ जे गत वर्षी अतिवृष्टी लाभा पासून वंचित आहेत त्यांचा समावेश,परतूर शहरातील गुंठेवारी सुरू करणे,शहरातील स्वच्छता, व इतर समस्या सोडवणे,वाटर ग्रिड योजनेचे पाणी न पोहोचलेल्या गावाना पाणी देणे,आष्टी येथील ३.५४ कोटी पाणीपुरवठा कामातील भ्रष्टाच्याराची चौकशी करून कारवाई करणे,घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक थांबवणे,गायरान जमिनी कायम करून ७/१२ वर नोंद घेणे mregs पांदान रस्ते कामावर खडीकरणास मंजुरी देणे श्रीष्टी,को.हदगाव, संकनपुरी दलित स्मशान भूमीस जागा उपलब्ध करून देणे,ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग दिव्यांग निधी चे तत्काळ वाटप करणे,व इतर मागण्याच्या पुरतते साठी हे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री गायकवाड साहेब यांच्याशी करून चर्चा करून निवेदन देण्यात आले. शेवटी आभार मानून आंदोलन संपले.*
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






