नुमान चाऊस यांची अँटी करप्शन फाउंडेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

जिल्ह्यात कोणीही इथून पुढे लाच घेता कामा नये

केंद्र सरकार मान्यता प्राप्त अँटी करप्शन फाउंडेशन ही संस्था देशभरात भ्रष्टाचार-लाचखोरी कमी करण्यासाठी कार्यरत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामान्य लोकांची व गरजूंची लाच न देता कामे झालेली आहेत. या फाउंडेशनच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य असताना नुमान अली चाऊस यांनी समाज भ्रष्टाचार व लाचमुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शासकीय कार्यालय जसे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका, पंचायत समिती व इतर शासकीय ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त व लाच मुक्त वातावरण बनवले तसेच अनेक गोरगरिबांची कामे लाच न देता नुमान अली चाऊस यांच्यामुळे पूर्णत्वास आली. ही कामगिरी बघून अँटी करप्शन फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव शर्मा यांनी नुमान अली चाऊस यांना बीड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. जबाबदारीच्या या पदावर नियुक्त झाल्यानंतर जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य जनतेसाठी भ्रष्टाचार मुक्तीचे काम करण्याचा हा प्रयत्न पुढे चालू ठेवणार असल्याचे चाऊस यांनी सांगितले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल