स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
दहिवली कल्याण : युवा संस्कार सतर्क संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय कांबळे व भरत दळवी उपस्थित होते. कार्यक्रमात मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच वेशभूषा, चित्रकला, वक्तृत्व, विज्ञान अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याशिवाय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला युवा संस्कारचे शिल्पा मिरकुटे, दिपाली खंडागळे, कमलाकर राऊत, सोमनाथ राऊत, तन्वी पारधी, विशाल फसाले, सागर पवार, उज्वला देसले, संजय मुकणे यांसह मान्यवर उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






