महाविकास आघाडी परभणी जिल्ह्याच्यावतीने क्रांती चौकातील क्रांतीस्तंभास अभिवादन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

परभणी – 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाविकास आघाडी परभणी जिल्ह्याच्यावतीने आज सकाळी शहरातील क्रांती चौक येथे क्रांतीस्तंभास अभिवादन करून स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी, त्यातील परभणी जिल्ह्याचा सहभाग आणि हुतात्म्यांच्या त्यागाचे महत्त्व यावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी संघर्ष, बलिदान आणि एकजुटीचा अद्वितीय इतिहास घडवला. आजच्या पिढीने हा वारसा जपून लोकशाही, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात महाविकास आघाडीचे जिल्हा पदाधिकारी, विविध घटकांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती चौक परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी उपस्थितांनी संविधान, लोकशाही आणि स्वातंत्र्य मूल्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला.या वेळी काँग्रेसचे सुहास पंडित युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव, रोहिदास बोबडे, शिवाजी भालेराव, दिगंबर खरवडे, शजी अहेमद खान,शिवसेना उबाठा पांडुरंग उर्फ पप्पू जाधव, समर्थ आवचार , राष्ट्रवादी काँग्रेस श.प. चे गंगाधर यादव, आतिष गरड आदि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल