उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर हे वेगवेगळे उपक्रम सतत राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन आहे यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते श्रावण , अध्यात्म ,निसर्ग, पर्यावरण अशा विविध विषयावर कविता सादर केल्या जातात .यामध्ये फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी, कवयित्री मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि सहभागी सर्वांनाच ऑनलाइन प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते .या श्रावण महिन्यांमध्ये दिनांक 16 ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी 8 ते 9.30 या वेळामध्ये झूम मीटिंगद्वारे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असुन या शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाच्या अध्यक्षा उज्जैनकर फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा दिघी आळंदी जिल्हा पुणे येथील कवयित्री सौ.रूपाली ताई चिंचोलीकर असून या कवी संमेलनामध्ये फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. तर दिनांक 23 ऑगस्ट 2025 शनिवार रोजी मा.सौ.अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली या ई कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .या दोनही शनिवारी आयोजित ई कवी संमेलनाचे सुरेल सूत्रसंचालन उज्जैनकर फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षा जळगाव येथील कवयित्री श्रीमती ज्योतीताई राणे या करणार आहेत याप्रसंगी सुद्धा फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत .या कवी संमेलनात फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या कविता सादर करून सहभाग घेतील आणि हे ई कवी संमेलन उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर नेहमीप्रमाणे झूम मीटिंगच्या माध्यमातून नियंत्रित करणार आहेत असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल