अनुकूल वार्षिक अंकाचे विमोचन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

पाथरी:-दिनांक 8 ऑगस्ट रोजी स्व. नितीन महाविद्यालय, पाथरी यांच्या “अनुकूल” वार्षिकांक “कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर” याचे विमोचन सत्यम शिवम सुंदरम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. कुणाल भाऊ लहाने यांच्या हस्ते पार पडले.
दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या लिखाण कौशल्याला वाव मिळवण्यासाठी प्रकाशित करण्यात येणाऱ्या 2024 -25 चे वार्षिक अंक “अनुकूल” विषय कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर यांच्या ञि शताब्दी वर्षानिमित्त निवडण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सामाले एस. टी. तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव मा. कुणालभाऊ लहाने हे होते.
अनुकूल विमोचनासोबतच महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राठोड एस. जी. व डॉ. शारदा पवार लिखित “राजकीय विचारप्रणाली” व डॉ. शारदा पवार लिखित “महिला आरक्षण: सिद्धांत आणि वास्तव” या दोन पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रोफेसर डॉ. बोचरे जे. एम. (इतिहास विभाग प्रमुख), प्रा. डॉ. राठोड एस. जी. (राज्यशास्त्र विभाग प्रमुख), प्रा. डॉ. संदीप जाधव (इंग्रजी विभाग) तसेच डॉ. शारदा पवार हे मंचावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सुंदर गजमल यांनी महत्वाची भुमीका बजावली
कार्यक्रमाचे संचालन प्रा. काळे टी.एफ. यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. संदीप जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बोचरे जे. एम. यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल