जळगांव येथे आयोजित “रानभाजी महोत्सव” येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची भेट

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील

जळगांव येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषि विभाग जळगाव, आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र व रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव चे आयोजन करण्यात आले यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन शेतकऱ्यांकडून विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.जळगाव जिल्हयात मागील 5 वर्षांपासुन रानभाजी महोत्सव चे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी सुध्दा जळगाव जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेतील व जिल्हयातील इतर जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांचे महत्व, त्यातील जीवनसत्वे, खनिजे आणि औषधी या गुणधर्माबाबत शहरवासीयांना महत्व पटवुन देणेसाठी कृषि विभाग जळगाव, आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र व रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या महोत्सवात रानभाज्यांपासुन तयार करण्यात आलेल्या पाक कलाकृती स्पर्धेचे आयोजन सुध्दा करण्यात आले. यावेळी महराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या आर्थिक सहकार्यातुन प्रवासी वाहन कर्ज योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्यासह आदिवासी विकास मंत्री मा.डॉ.अशोक उईके, वत्रोद्योग मंत्री मा.श्री.संजय सावकारे, आमदार श्री.सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार श्री.चंद्रकांत सोनवणे, आमदार श्री.चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल तसेच आदिवासी विभाग अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल