गुरु गोविंदसिंग इंग्लिश स्कूल म्हारळ शाळेचा अजब कारभार फी भरली नाही म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना केले शाळेच्या बाहेर तासभर उभे

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

कल्याण तालुक्यातील गुरुगोविंद सिंग इंग्लिश स्कूल म्हाराळ या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना उभे करण्यात आल्याची घटना म्हारळ येथे घडली असून सदर घटनेची तक्रार या शाळेत शिकत असणाऱ्या पालक वर्गाने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कल्याण शिक्षण विभाग यांना केली आहे .या विद्यार्थ्यांना एक तासभर बाहेर उभे केले होते असेही निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या म्हणण्या नुसार बाहेरच्या रूममध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना डांबून ठेवले होते अशीही तक्रार पालक वर्गाने केली आहे. याबाबत शिक्षण विभाग कल्याण पंचायत समिती यांनी गुरु गोविंदसिंग इंग्लिश स्कूल म्हारळ या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे व्यवस्थापक यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती केली आहे. न्याय न मिळाल्यास लवकरच कल्याण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पालक वर्गाने याबाबत दिला आहे. शिक्षण संस्था या व्यवसायाच्या केंद्र बिंदू झाल्या असून सदर घटना महाराष्ट्रात घडत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.याच महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात शिक्षण घरोघरी पोहोचावं म्हणून जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले त्या अनुषंगाने सदर घटना लाजिरवाणी असून लवकरात लवकर सदर संस्थेवर व मुख्याध्यापकावर कारवाई झाली पाहिजे असे जनतेचे मत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल