स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
दिनांक 3 ऑगस्ट राणीसावरगाव तालुका गंगाखेड जी, परभणी येथे श्री आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट चे दानदाते , माता मंजुलाबेन कीर्तीलाल शाहा परिवार तर्फे श्रीमती दिप्तीवेन राजेन भाई शाह परिवार, तर्फे निर्माण शेडचे उद्घाटक श्री जयेश भाई शाह जरीवालाजी, श्री दिनेश भाई शाह,श्री मुकेश भाई शाह, श्री नेमचंद भाई शाह, यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धरमचंदजी गंगवाल साहेब प्रमुख उपस्थिती सुनीलजी सूर्यवंशी महाराष्ट्र शासन गोसेवा आयोग सदस्य , व पूजनीय हरिभक्त परायण सुदाम महाराज भोसले, राणीसावरगाव चे सरपंच बबीताताई जाधव,गोशाळा संचालक शिवप्रसाद कोरे , उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून . गोमाता पूजन करून शेडचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर श्री संगीताबेन शेठ ,श्री परेश भाई सेठ ,श्री योगेश भाई मानेक, सेवा निवृत्त डी. वाय. एस. पी.श्री लंजिले साहेब, गोशाळा संचालक शिवसांब कोरे ,ओंकार कोरे, मारुती अप्पा कोरे व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोमातेला हिरवा चारा मान्यवरांच्या हस्ते खाऊ घालण्यात आला. यावेळी प्रस्तावना शिवप्रसाद कोरे यांनी करताना गोमातेला वाचवायचे असेल तर गाय आधारित कृषी करून गोकृपा अमृत चा उपयोग करूनच विषमुक्त शेती विषमुक्त अन्न उपक्रम साकार होईल. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा जीवदयासाठी कार्य करत आहे. करत राहील आपण शेड निवारा गोमातेला दिल्याबद्दल आदरणीय श्री जयेश भाई शहा यांचे वारंवार त्यांनी अभिनंदन केले. प्रमुख मार्गदर्शक श्री जयेश भाई शहा यांनी यापुढे जीवदयासाठी निरंतर कार्य करत राहणार शिवप्रसाद कोरे व संपूर्ण परिवाराचे कार्य खूप चांगले आहे. यापुढे सुद्धा मी त्यांच्यासोबत आहे. जीवदयाचे काम चांगल्या पद्धतीने ते करत आहेत. याची मला पूर्ण खात्री आहे. यापुढे सुद्धा श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या गोशाळेला मदत करत राहणार असे आश्वासन त्यांनी दिले. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या माध्यमातून शेकडो शेड गोमातेंना दान द्वारा देण्यात आले आहेत मी फक्त पोस्टमॅन चे काम करतो असे स्वतःबद्दल मत मांडले , डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी राणी सर्वांची गोशाळा करत असलेले सेंद्रिय शेतीचा उपक्रम मी अनेक वर्षापासून शिवप्रसाद कोरे यांची गोमातेबद्दलची तळमळ जाणून आहे म्हणून त्यांच्यासोबत खंबीर उभा आहे यापुढे सुद्धा महाराष्ट्र शासन गोसेवा आयोग माध्यमातून वेळोवेळी गोसेवा आयोग सर्व गोशाळांना मदत करण्यासाठी तत्पर आहे असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक शिवसांभ कोरे यांनी केले , आभार संचालक प्रदर्शन ओंकार कोरे यांनी केले. जयेशभाई शहा यांनी गो शाळेत काम करणाऱ्या सर्व 14 गो सेवकांना 1 महिन्याचे राशन किट भेट दिली,गोमातेला दिलेल्या निवारा शेड बद्दल सर्व गावकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






