पाथरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

पाथरी:-येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवार ७ ऑगष्ट रोजी शिवसेना उप नेते खासदार संजय जाधव यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे व तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची व आजी माजी पदाधिकारी व स्थानिक शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर निवडणुका लढण्याच्या संदर्भात चर्चा होऊन स्वबळावर सर्व निवडणुका लढवाव्यात असा निर्णय झाला सर्व शिवसैनिकांच्या व उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या बाबतीत सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त करत होऊ घातलेल्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या बाबतीत निर्णय झाला या बैठकीला शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे शहर प्रमुख दीपक कटारे माजी जिल्हा परिषद सदस्य रणजीत नाना गिराम युवासेना तालुकाप्रमुख पांडुरंग शिंदे, पंचायत समिती सदस्य शरद कोल्हे , सदस्य ज्ञानेश्वर शिंदे तालुका समन्वयक हरिभाऊ वाकणकर, उप तालुका प्रमुख तुकाराम हरकळ. ,रावसाहेब निकम, सर्कल प्रमुख सत्यनारायण घाटूळ देवनांद्रा सर्कल प्रमुख रमेश नायकल, अविराज टाकळकर सर्कल प्रमुख विजय नखाते ,सुरेश नखाते,पप्पू रनेर, बालू कोल्हे, राधे गिराम, रणजित गायकवाड, राजेश मस्के, रोहन कदम, शिवराम धर्मे, तुकाराम लोखंडे, तालुक्यातील अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील सभेला समारोप करताना रवींद्र धर्मे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व शिवसैनिकांच्या भावना या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचू अशी भावना व्यक्त केली. व याबाबतीत शिवसेना उपनेते खा.संजय जाधव हे आपल्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील असे धर्मे यांनी सांगितले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल