स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
राष्ट्र जन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने अनुसुचित जमाती विद्यार्थ्यांच्या पदभरती करता आमरण उपोषण दिनांक २५ जुलैपासून चालू आहे स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय समोर परभणी येथे एकच लढा आदिवासींच्या विद्यार्थ्यांचा लढा न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी खाली दिलेल्या तात्काळ सहाभुवतीपूर्वक पूर्ण करण्यात यावा मागण्या नम्र विनंती नंबर मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून सुद्धा आदिवासी विशेष पदभरती झाली नाही अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांची बारा हजार पाचशे वीस पदाची भरती तात्काळ करण्यात यावी ,शासकीय व निम शासकीय पद भरती मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावं, शासनाचा निर्णय 2019 पासून जाती पडताळणीसाठी समित्याकडे प्रलंबित असलेल्या सशर्त वैद्यता प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अनुजमाती प्रवर्गातील रिक्त पद 85 हजार पदाची भरती तात्काळ सुरू करण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांचे सार्वजनिक आरोग्य विभागातील 1541 गटअ. ब. क. ड. च्या संवर्गाच्या रिक तात्काळ भरण्यात यावी, आदिवासी मुला व मुलींचे स्वमालकी हक्काचे वस्तीग्रह जिंतूर येथे सुरू करण्यात यावे, आदिवासी प्रशिपण संस्था TRTI याच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण खंड न पडता चालू ठेवण्यात यावा अशा वरील सात वागण्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पूर्ण करण्यात यावा अशी मागणी केंद्र राज्य शासनाकडे करण्यात येत आहे उपोषणा स्थळे भेट देऊन पाठिंबा देण्यात आला तात्काळ मागण्या पूर्ण करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






