पत्रकार महेश जोशी यांना पोलीस मित्र समितीतर्फे ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

आज दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस मित्र समिती शाखा पाथरी तालुका पातळीवर एक अत्यंत गौरवास्पद झाले . समितीचे तालुका अध्यक्ष आणि ख्यातनाम पत्रकार महेश जोशी यांना पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत प्रदान करण्यात येणार आहे.या विशेष सन्मानानिमित्त, जोशी यांचा त्यांच्या मित्र परिवारातर्फे सत्कार समाजसेवक अहमद भाई अन्सारी पत्रकार आयुब खान आणि पत्रकार रईस कुरेशी यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी महेश जोशी यांच्या पत्रकारितेतील कार्याची आणि सामाजिक भान असलेल्या पत्रकारितेची प्रशंसा केली. त्यांच्या कार्यामुळे पाथरी तालुक्यात जनतेच्या प्रश्नांना आवाज मिळाला असून, त्यांच्या बिनधास्त आणि निष्पक्ष पत्रकारितेमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे संपूर्ण पाथरी तालुक्यात आणि पत्रकार संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, जोशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल