स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
परभणी, दि 05/08/2025 जिल्हा महिला बाल विकास, एस.बी.सी ३/युनिसेफ मुंबई आणि सेवा संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवारी (दि.४) रोजी विद्यासागर हायस्कूल, करंजी येथे बालविवाह आणि त्याचे दुष्परिणाम त्याचबरोबर लिंग भेदभाव स्त्री-पुरुषसमानता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.सेवा संस्थेच्या स्वयंसेवीका सुनीता काळे यांनी विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी गाण्याच्या माध्यमातुन लग्नाचे योग्य वय, स्वावलंबन, योग्य निर्णय, शिक्षणाचे महत्व याबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध, स्त्री पुरुष समानते विषयी संदेश देण्यात आला. मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यावर तसेच मुलाचे वय २१ वर्ष झाल्यावर लग्न करावे असे मुलांना मार्गदर्शन केले. मुले आणि मुलींने जर उच्चशिक्षण घेतले तर ते स्वावलंबी बनतील. शाळेतील विद्यार्थ्यांना चाईल्ड हेल्प लाईन नंबर १०९८ याचा उपयोग विविध ठिकाणी कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.मुख्याध्यापक श्री. वसेकर व शिक्षकांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. एस. बी सी.३/ युनिसेफ संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






