पाथरीतील अक्षय कॉम्प्युटर्स ला पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे एम.के.सी.एल.कडून विभागीय सन्मान

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) तर्फे आयोजित विभागीय कार्यक्रमात अक्षय कंप्युटर, पाथरी (सेंटर क्र. 15210137) या संस्थेला “Best Practices & Last Five Years Continued Performance” या श्रेणीत Certificate of Appreciation देऊन सन्मानित करण्यात आले.०४ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे संचालक तुकाराम पौळ सर व सौ.शिवकण्या पौळ यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी MKCL चे वरिष्ठ अधिकारी समीरजी पांडे,अतुल पतोडी, अमित रानडे,महेश पत्रिके,सिद्धार्थ पाटील,कोशल ओव्हळ,जिवन लेंभे,अमर देवडे व विविध जिल्ह्यांतील केंद्र प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.अक्षय कंप्युटरने गेल्या पाच वर्षांपासून MS-CIT व KLiC कोर्सेसमध्ये शिस्तबद्ध कार्यपद्धती, विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सुलभता, गुणवत्तापूर्ण अध्यापन, वेळेचे नियोजन व सातत्याने विद्यार्थ्यांना उत्तम निकाल देण्याचे कार्य केले आहे.या यशाबद्दल तुकाराम पौळ सर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या परिश्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विश्वासाचे फलित आहे. येणाऱ्या काळातही आम्ही नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्रसारासाठी कार्यरत राहू.”या पुरस्कारामुळे पाथरीसह संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक अभिमानाची नोंद झाली आहे.माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब काका टेंगसे व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व विद्यार्थी-पालकांनी पौळ सरांचे अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल